मुंबई : मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असताना मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. दोन्ही लस पूर्ण झालेल्या भक्तांनाच 'ताजिया' मिरवणूकीत सामील होता येणार आहे. सात ट्रक मधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्याची परवानगी दिली गेली आहे.


एका ट्रकवर फक्त 15 जणांनाच परवानगी असणार आहे. दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान मिरवणुकीची परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुकीच्या शेवटी केवळ 25 जणांनाच कब्रस्तान मध्ये जाण्याची परवानगी असेल. 'ऑल इंडिया तहफुज ए हुसैनियत' या शिया पंथीय संस्थेने हायकोर्टात याचिका केली होती.