काँग्रेस आघाडीची वाट पाहतोय, अन्यथा दोन जागा लढणार - कम्युनिस्ट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा सोडली तर ठीक नाहीतर दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कम्युनिस्ट मार्क्सवादीने (सीपीएम) घेतला आहे.
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा सोडली तर ठीक नाहीतर दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कम्युनिस्ट मार्क्सवादीने (सीपीएम) घेतला आहे. आमदार जे पी गावित हे दिंडोरीमधून मार्क्सवादीचे उमेदवार असतील. सिपीएमने दोन जागा आघाडीकडे मागितल्या आहेत. पैकी किमान दिंडोरीची जागा सीपीएमला मिळावी हा हट्ट सिपीएएमचा आहे. जर असे नाही झाले तर स्वतंत्रपणे दिंडोरीची जागा लढवण्याचा निर्णय सिपीएमने घेतले आहे.
सीपीएमकडून आणखी एक दिवस वाट पाहिली जाईल. आणि मग पालघरमध्ये उमेदवार घोषित केला जाईल. आघाडी नेमका काय निर्णय घेतेय हे पाहण्यासाठी दोन दिवस वाट पाहून मग पालघरच्या जागेचा उमेदवारही घोषित करू, असे पवित्रा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते अशोक ढवळे यांनी दिली.