मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के दिले आहेत. गेली पन्नास वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांचा आज शिवसेनेत प्रवेश केला. तर करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल, त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी देखील आज शिवबंधन बांधलं. रश्मी बागल या माजी मंत्री दिवंगत दिगंबर बागल आणि माजी आमदार शामल बागल यांच्या कन्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्मला गावित यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. मतदारसंघ विकासकामं व्हावीत, यासाठी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाण्याचा आग्रह धरल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं गावित यांनी स्पष्ट केलं.


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप आणि शिवसेनेमध्य जोरदार इनकमिंग सुरु आहे. विरोधकांचे मोठे नेते सत्तेत असलेल्या पक्षात सहभागी झाल्यामुळे विरोधकांपुढे मोठं आव्हान असणार आहे.