मुंबई: काँग्रेसने पुकारलेले भारत बंद आंदोलन म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे, अशी टीका भाजप नेते माधव भंडारी यांनी केली. ते रविवारी नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेसने 'भारत बंद' सारखे दिखाऊ कार्यक्रम बंद करावेत. त्यापेक्षा जीएसटी परिषदेत पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव मांडावा. जीएसटी परिषदेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यास इंधनाचे दर आपोआप कमी होतील. मात्र, जीएसटी परिषदेतील बिगरभाजप सदस्यच या प्रस्तावाला विरोध करत असल्याचा आरोप भंडारी यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपाई गवई गट, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेनेने आपण बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दिला.


या बंदच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही तसंच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.