मुंबई : काँग्रेसने जाहीर केलेल्या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने येत्या १०  सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अनेक विरोधी पक्ष सहभागी असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आंदोलनाची धार अधिक वाढणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरांमध्ये लागोपाठ थोडी-थोडी वाढ होत आहे. त्यातच आता विरोधकांना सरकारच्या विरोधात चांगलंच हत्यार सापडलं आहे. काँग्रेसने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरोधात १० सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. 


काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, 'महागाई जीव घेत आहे. पेट्रोल डिझेल कंबरडं मोडत आहे. जनता त्रस्त आहे. यामुळे १० तारखेला भारत बंद राहणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपवर आंदोलन केलं जाणार आहे. मोदी सरकारमुळे कोणीच आनंदी नाही. मोदी सरकार राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांमध्ये आक्रोश आहे. काँग्रेसची बैठक झाली असून आणखी काही विरोधी पक्षांशी चर्चा सुरु आहे.'