शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे अभियान, `माझी कर्जमाफी झाली नाही`
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसचा विरोध अजूनही कमी व्हायला तयार नाही. कर्जमाफीबाबत काँग्रेस सरकारविरोधात आजपासून राज्यभर अभियान छेडणार आहे.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसचा विरोध अजूनही कमी व्हायला तयार नाही. कर्जमाफीबाबत काँग्रेस सरकारविरोधात आजपासून राज्यभर अभियान छेडणार आहे.
कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेस हे अभियान राबवणार आहे. या अभियानाला बुलढाणा जिल्ह्यातून सुरूवात होणार आहे. 'माझी कर्जमाफी झाली नाही' असं या अभियानाचं नाव आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी झालेली नाही त्या जिल्ह्यातल्या शेतक-यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत आणि पावसाळी अधिवेशनात हे अर्ज सरकारसमोर सादर केले जाणार आहेत. त्यामुळं पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजणार असल्याचं दिसत आहे.