नागपूर : काँग्रेस स्थापना दिनी (congress foundation day) यावर्षी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi) मुंबईत (Mumbai) असणार आहेत. शिवाजी पार्कवर राहुल गांधी सभा घेणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. काँग्रेसला (Congress) संपवायला निघालेलेच संपलेत, अशी टीका त्यांनी भाजपवर (BJP) केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची शिवाजी पार्क येथे सभा व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी घोषणा केली आहे. काँग्रेस समितीच्या काल शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.



काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने (congress celebrate congress foundation day) येत्या 28 डिसेंबर रोजी शिवाजी पार्कात शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती एच के पाटील यांनी जाहीर केले. या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पार्क मैदानाला आपला स्वतःचा असा इतिहास आहे. त्यामुळेच या एतिहासिक मैदानावरच सभा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई प्रदेश काँग्रेसकडून शहरात मोठा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यादिवशी पक्षाच्या आणखी कार्यक्रमाची घोषणाही होईल असेही ते म्हणाले.


काँग्रेस आगामी कालावधीत निवडणुकांसाठी सध्या काय रणनिती असणार यासाठीचा अभ्यास करत आहे. त्यासाठीच अभ्यास आणि विचार मंथनासाठी आम्ही येत्या कालावधीत पुन्हा एकदा भेटत आहोत. राज्यात आगामी निवडणुका पाहता आघाडीबाबत काय रणनिती असेल यससााठी आम्ही पुन्हा भेटणार आहोत असेही ते म्हणाले.