मुंबई: घटस्थापनेचा मुहूर्त साधत रविवारी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नसीम खान, नितीन राऊत यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. त्यांनी आपली पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. मात्र, काँग्रेसने अमिता चव्हाण यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी दिली आहे. मात्र, यामध्ये दक्षिण कराडमधील जागेचा समावेश नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण लोकसभेची निवडणूक लढणार का विधानसभेची, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


तत्पूर्वी आज शिवसेनेकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर, कोकण आणि मुंबईतील जागांचा समावेश आहे.


काँग्रेसच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे

१. के.सी. पडवी ( अक्कलकुवा)
२. पद्माकर वाळवी ( शहादा) 
३. शिरीष नाईक (नवापूर)
४. शिरीष चौधरी (रावेर)
५. हर्षवर्धन सकपाळ ( बुलढाणा)
६. अनंत वानखेडे (मेहकर) 
७. अमित झनक ( रिसोद)
८. वीरेंद्र जगताप ( धामणगाव रेल्वे)
९. यशोमती ठाकूर ( तेओसा)
१०. अमर काळे (आर्वी)
११. रंजित कांबळे ( देओली)
१२. सुनिल केदार (सावनेर)
१३. नितीन राऊत (नागपूर उत्तर )
१४. विजय वडेट्टीवर (ब्रह्मपुरी)
१५. सतिश वरजुरकर (चिमूर) 
१६. प्रतिभा धानोरकर (वरोरा)
१७. अनिल मंगळुरकर (यवतमाळ)
१८. अशोक चव्हाण (भोकर)
१९. डी.पी. सावंत (नांदेड उत्तर)
२०. वसंतराव चव्हाण (नायगाव)
२१. रावसाहेब अनंतपूरकर (देगलूर)
२२. संतोष तरफे ( कळमनुरी)
२३. सुरेश वरपुडकर (पाथरी)
२४ डॉ. कल्याण वैजनाथ काळे ( फुलांबरी) 
२५ शेख असीफ शेख रशीद (मालेगाव सेंट्रल)
२६. रोहित चंद्रकांत साळवे (अंबरनाथ )
२७. सय्यद मुझफर हुसैन ( मीरा भाइंदर) 
२८. सुरेश हरिशचंद्र कोपरकर (भांडूप पश्चिम)  
२९. अशोक जाधव  (अंधेरी पश्चिम) 
३० नसीम खान ( चांदिवली) 
३१चंद्रकांत दामोदर हंडोरे (चेंबूर), 
३२ झीशान झियाउद्दीन सिद्दगी (वांद्रे पूर्व)
३३ वर्षा एकनाथ गायकवाड (धारावी)
३४ गणेश कुमार यादव (शिव कोळीवाडा)
३५ अमीन पटेल (मुंबा देवी)
३६ अशोक जगताप (कुलाबा)
३७ माणिक जगताप (महाड)
३८ संजय जगताप (पुरंदर)
३९ संग्राम थोपटे (भोर)
४० रमेश बगावे (पुणे)
४१ विजय थोरात (संगमनेर)
४२. अमित देशमुख (लातूर)
४३. अशोक निलंगेकर ( निलंगा)
४४. बसवराज पाटील (औसा)
४५. मधुकर चव्हाण (तुळजापूर) 
४६. प्रणिती शिंदे (सोलापूर मध्य)
४७. मौलवी बसहुमिया सय्यद ( सोलापूर दक्षिण)
४८. ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण)
४९. पी.एन. पाटील सडोलीकर ( करवीर)
५०. विश्वजीत कदम ( पळूस-कडेगाव)
५१. विक्रम सावंत ( जत)