`राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन, 2024 साली होणार पंतप्रधान`
राहुल गांधी द्रष्टे नेते असून 2024 साली ते पंतप्रधान होतील - नाना पटोले
पुणे : राज्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) निधीवाटपावरून आधीच सर्वकाही आलबेल असतानाच तिकडे दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रीय पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष करण्यात यावं याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं ट्विट केलं आहे. हे ट्विट केल्यानंतर नाना पटोले यांनी आज पुण्यात आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. राहुल गांधी द्रष्टे नेते असून 2024 साली ते पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे, त्याला जनता कंटाळली आहे. 'राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे. 2019 च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली होती. या देशाला पुढच्या काळात काँग्रेसच सांभाळू शकते म्हणून मी ट्विट केलंय, भाजपच्या कामाला जनता कंटाळली आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
देशपातळीवर भाजपला मोडीत काढायचे असल्यास काँग्रेसच पर्याय आहे. राज्य पातळीवरच्या पक्षांनी विचार केल्यास पर्यायाने भाजपला मदतच केली जाईल." असे ठाम मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
25 आमदारांनी मागितली सोनिया गांधी मागितली भेट
युती सरकारच्या काळात भाजप शिवसेना सरकार मध्ये आलबेल होतं, हे 3 पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे थोडं कमी जास्त होणारच. आमदार आपल्या मतदार संघात काम करतात त्यांना पक्ष अध्यक्षांना भेटायची इच्छा असते ते भेटू शकतात. असं नाना पटोले यांनी काँग्रेस आमदारांच्या कथित नाराजीवर भाष्य केलं आहे.