काँग्रेस-राष्ट्रवादीला `वंचित`कडून 25 ठिकाणी `दे धक्का`
वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित ठेवण्यात यश मिळालं आहे, असं म्हणता येईल. कारण राज्यात
मुंबई : वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित ठेवण्यात यश मिळालं आहे, असं म्हणता येईल. कारण राज्यात 25 ठिकाणी ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जिंकला आहे. त्या ठिकाणी वंचितचे उमेदवार नंबर 3 वर आहेत. (यादी खाली बातमीत दिली आहे) राष्ट्रवादीपेक्षाही काँग्रेसला जास्त ठिकाणी वंचितने धक्का दिला आहे. भाजपविरोधातील 'नाही रे' लाटेला ब्रेक लागला आहे. तो वंचितमुळेच.
एवढंच नाही या 25 जागांवर वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयासाठी जेवढी मतं गरजेची होती, त्यापेक्षाही जास्त मतं पडली आहेत. वंचितला महाराष्ट्रात एकही जागा मिळवण्यात यश आलेलं नाही. या उलट एमआयएमच्या हाती 2 जागा लागल्या आहेत.
मात्र 9 ठिकाणी वंचित आघाडी 2 नंबरला राहिलेली आहे, हे देखील विसरता येणार नाही. यात अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, बुलढाणा, कळमनुरी, लोहा, मिर्झापूर, सोलापूर शहर उत्तर, वाशिमचा समावेश आहे.
विदर्भ : अकोला पश्चिम - भाजप विजयी
भाजप : गोवर्धन मांगीलाल शर्मा : ७३ हजार २६२ मते
काँग्रेस : साजीदखान मनलाल खान : ७० हजार ६६९ मते
वंचित : मदन भर्गद : २० हजार ५६३ मते
विदर्भ : अरणी - भाजप विजयी
भाजप : धुर्वे संदीप प्रभाकर : ८१ हजार ५९९ मते
काँग्रेस : शिवाजीराव मोधे : ७८ हजार ४४९ मते
वंचित : निरंजन मेश्राम : १२ हजार ३०७ मते
विदर्भ : बल्लारपूर - भाजप विजयी
भाजप : सुधीर मुनगंटीवार : ८६ हजार ०२ मते
काँग्रेस : विश्वास झाडे : ५२ हजार ७६२ मते
वंचित : झोडे राजू : 39 हजार ९५८ मते
विदर्भ : चिखली - भाजप विजयी
भाजप : श्वेता महाले : ९३ हजार ५१५ मते
काँग्रेस : राहुल बोंद्रे : ८६ हजार ७०५ मते
वंचित : अशोक सुराडकर : ९ हजार ६६१ मते
विदर्भ : चिमूर - भाजप विजयी
भाजप : बंटी भांगडीया : 87 हजार 147 मते
काँग्रेस : सतिश वारजूकर : 77 हजार 394 मते
वंचित : अरविंद सांडेकर : 24 हजार 474
विदर्भ : धामणगाव रेल्वे - भाजप विजयी
भाजप : प्रताप अडसाद : 90 हजार 832
काँग्रेस : वाल्मिकराव जगताप : 81 हजार 313
वंचित : नीलेश विश्वकर्मा : 23 हजार 700
विदर्भ : खामगाव - भाजप विजयी
भाजप : आकाश फुंडकर : 90 हजार 167
काँग्रेस : ज्ञानेश्वर पाटील : 73 हजार 446
वंचित : शरद वसाटकर : 25 हजार 957
विदर्भ : नागपूर दक्षिण - भाजप विजयी
भाजप : आकाश फुंडकर : 90 हजार 167
काँग्रेस : ज्ञानेश्वर पाटील : 73 हजार 446
वंचित : शरद वसाटकर : 25 हजार 957
विदर्भ : यवतमाळ - भाजप विजयी
भाजप : मोहन मते : 84 हजार 339
काँग्रेस : गिरीश पांडव : 80 हजार 326
वंचित : रमेश पिसे : 5 हजार 583
पश्चिम महाराष्ट्र : पुणे छावणी - भाजप विजयी
भाजप : सुनील कांबळे : 52 हजार 160
काँग्रेस : रमेश बागवे : 46 हजार 988
वंचित : लक्ष्मण अर्डे : 10 हजार 09
पश्चिम महाराष्ट्र : राळेगाव- भाजप विजयी
भाजप : अशोक वुईके : 90 हजार 823
काँग्रेस : वसंत पुरके : 80 हजार 948
वंचित : महादेव कोहळे : 10 हजार 682
पश्चिम महाराष्ट्र : शिवाजीनगर - भाजप विजयी
भाजप : सिद्धार्थ शिरोळे : 58 हजार 580
काँग्रेस : दत्ता बहिरट : 53 हजार 630
वंचित : अनिल कुर्हाडे : 10 हजार 442
पश्चिम महाराष्ट्र : तुळजापूर - भाजप विजयी
भाजप : राणाजगजितसिंह पाटील : 99 हजार 034
काँग्रेस : मधुकरराव चव्हाण : 75 हजार 865
वंचित : अशोक जगदाळे : 35 हजार 153
पश्चिम महाराष्ट्र : उस्मानाबाद - शिवसेना विजयी
शिवसेना : कैलास घाडगे-पाटील : 87 हजार 488
राष्ट्रवादी : संजय निंबाळकर : 74 हजार 021
वंचित : धनंजय शिंगाडे : 15 हजार 755
पश्चिम महाराष्ट्र : खडकवासला - भाजप विजयी
भाजप : भीमराव तापकीर : 1 लाख 20 हजार 518
राष्ट्रवादी : सचिन ढोके : 1 लाख 17 हजार 923
वंचित : आप्पा आखाडे : 5 हजार 931
पश्चिम महाराष्ट्र : माळशिरस - भाजप विजयी
भाजप : राम सातपुते : 1 लाख 2 हजार 562
राष्ट्रवादी : उत्तमराव जानकर : 1 लाख 917
वंचित : राज कुमार : 5 हजार 516
पश्चिम महाराष्ट्र : दौंड - भाजप विजयी
भाजप : राहुल कूल : 1 लाख 3 हजार 664
काँग्रेस : रमेश थोरात : 1 लाख 2 हजार 918
वंचित : तात्यासाहेब तम्हाणे : 2 हजार 633
मराठवाडा : नांदेड दक्षिण - शिवसेना विजयी
शिवसेना : राजश्री पाटील - 37 हजार 66
काँग्रेस : मोहनराव हंबर्डे - 46 हजार 943
वंचित : फारूक अहमद इकबाल अहमद - 26 हजार 713
मराठवाडा : गेवराई - भाजप विजयी
भाजप : लक्ष्मण पवार - 99 हजार 625
राष्ट्रवादी : विजयसिंग पंडीत - 92 हजार 833
वंचित : विष्णू देवकाते - 8 हजार 306
मराठवाडा : जिंतूर - भाजप विजयी
भाजप : मेघना बोर्डीकर - 1 लाख 16 हजार 913
राष्ट्रवादी : विजय भंबाळे - 1 लाख 13 हजार 196
वंचित : मनोहर रूस्तम - 13 हजार 172
मराठवाडा : पैठण - शिवसेना विजयी
शिवसेना : संदीपनराव भुमरे - 83 हजार 403
राष्ट्रवादी : दत्तात्रय गोर्डे - 69 हजार 264
वंचित : विजय चव्हाण - 20 हजार 654
मुंबई : चांदीवली - शिवसेना विजयी
शिवसेना : दिलीप लांडे - 85 हजार 879
काँग्रेस : नसीम खान - 85 हजार 470
वंचित : अबूल हसन खान - 8 हजार 876
मुंबई : चेंबूर - शिवसेना विजयी
शिवसेना : प्रकाश फातर्फेकर - 53 हजार 264
काँग्रेस : चंद्रकांत हांडोरे - 34 हजार 246
वंचित : राजेंद्र माहुलकर - 23 हजार 178
उत्तर महाराष्ट्र : चाळीसगाव - भाजप विजयी
भाजप : मंगेश चव्हाण - 86 हजार 515
राष्ट्रवादी : राजीव देशमुख - 82 हजार 228
वंचित : मोरसिंग राठोड - 38 हजार 429
कोकण : उल्हासनगर - भाजप विजयी
राष्ट्रवादी : ऐलानी कुमार उत्तमचंद - 43 हजार 666
काँग्रेस : ज्योती कलानी - 41 हजार 662
वंचित : सजन सिंग - 5 हजार 589