मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत आजच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. ऑक्टोबरच्या अखेरीस आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीनंतर दिलेत. तसेच आघाडीत अन्य राजकीय पक्षांना सामावून घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आलाय. त्यामुळे आघाडीत कोणते पक्ष असणार याचीच उत्सुकता लागलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते धनंजय मुंडे यांच्या निवसस्थानी दोन्ही काँग्रेसची निवडणुकीबाबत महत्वाची बैठक झाली. त्यामुळे आघाडीबाबत दोन्ही पक्ष अनकुल असल्याचे स्पष्ट झाले. याबैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. तसेच इतर पक्ष आमच्याबरोबर येणार आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करतोय, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली, त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर शेवटपर्यंत आघाडीची चर्चा पूर्ण होईल, असे दोन्ही काँग्रेसने संकेत दिलेत. 


राज्यातील लोकसभा निवडणुकीतील आघाडी ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यापर्यंत अंतिम करण्याचा निर्णय करण्यात आलाय. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या दरम्यान काल दिल्लीत झालेल्या बैठकीत तसा निर्णय झालाय. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे आणि प्रफुल पटेलही उपस्थित होते. राज्यातील लोकसभेची आघाडी आणि उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया या महिना अखेर पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यानंतर राज्यात आघाडीचा संयुक्त मेळावा घेण्याची बैठकीत चर्चा झाली.