मुंबई : शरद पवारांनी आरक्षणबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची तारांबळ उडाल्याचं दिसतंय. काँग्रेस नेत्यांनी पवारांचं थेट समर्थन किंवा या भूमिकेला थेट विरोध करणं टाळलंय. हा व्यापक विषय असून त्यावर चर्चा होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा, काय म्हणालेत काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील... 



उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे...


शिवसेनाप्रमुख जेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हणत होते, तेव्हाच त्यांची भूमिका स्वीकारली असती, तर आज जातींच्या भिंती उभ्या राहिल्या नसत्या, असं म्हणत बाळासाहेब कळायला जरा उशीरच झाला, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय. शिवसेनाप्रमुखांनी यापूर्वीच हीच भूमिका घेतली होती. मात्र मंडल आयोगाचं भूत दाखवून त्यावेळी सेना फोडण्याचा प्रयत्न झाला, असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते.