मुंबई : महापालिका निवडणुकीत  (Municipal Corporation elections) काँग्रेसने (Congress) 'एकला चलो रे'ची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) चर्चा निष्फळ ठरली तर काँग्रेस (Congress) सर्व २२७ जागांवर लढेल, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेईल. हायकमांडने आदेश दिले तर २२७ जागांची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांसंदर्भात अजून शिवसेना आणि राष्ट्रवादीशी अजून चर्चा झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीचे एकत्र जमले नाही तर काँग्रेस एकटी लढेल, असे गायकवाड म्हणाले. मात्र याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तर काँग्रेस कसेही लढली तरी पराभव नक्की आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी मारला आहे. 



दरम्यान,  ज्यांनी (भाजप) मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) आमच्यासोबत २५ वर्षे बोरं चाखली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले, असे महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटले आहे. राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल त्यांनी भाजपला केला. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी स्वबळावर भाजपचा झेंडा फडकविण्याची घोषणा केली. त्याला शिवसेनेने  (Shiv sena) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.