मुंबई : भाजप आमदार राम कदमांच्या माफीनाम्यानंतरही राजकीय पक्षांची आंदोलनं सुरुच आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा पोलीस कारवाईच्या मागणीसाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात आंदोलन केलं. काल रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या घाटकोपर पोलीस ठाण्यात बसून होत्या.  दरम्यान, गुन्हा दाखल केला नाही तर आपण आत्मदहन करु, असा इशारा राष्ट्रवादीच्य प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे कदम प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे विधानाचा अभ्यास करुन कायदेशीर सल्ला घेऊन योग्य कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. पण सकाळी ११ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, तर आंदोलन पुन्हा करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या महिलांनी दिलाच होता. त्यानुसार पुन्हा एकदा आज आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 



दरम्यान, दहिहंडी उत्सवात केलेल्या महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपा आमदार राम कदम यांचे पक्ष प्रवक्ते पदाला स्थगिती देण्यात आली आहे.  त्यांना कोणत्याही वाहिनीवर पक्षाची बाजू मांडण्यासाठी जाऊ नका, अशा सूचना पक्षानं दिल्या आहेत.  त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे पक्षाची बदनामी होत असल्यामुळे हे पाऊल उचललं गेल्याची चर्चा आहे. मात्र पक्षाच्या अध्यात्म विभागाचे प्रमुखपद मात्र कदमांकडे कायम आहे. आता पक्षश्रेष्ठी कदमांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.