नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर
नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली.
मुंबई : राज्याचे प्रधान सचिव अर्थात मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली.
या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठीत झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यपालांना सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत.
राज्यातील निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली.
यावेळी भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अनुज जयपुरीयार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आणि अनिल वळवी हे उपस्थित होते.