मुंबई: परदेशातून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे देशात कोरोनचा Coronavirus प्रसार झाला. यासाठी सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi हेच जबाबदार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता. यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी मोदींविरोधात 302 चा गुन्हा दाखल करावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट'


तसेच लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे. गरीब आणखी गरीब होतील.


'लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारच मजुरांना कामासाठी परत शहरांमध्ये आणेल'


ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. अशा ठिकाणीही लॉकडाऊन करण्यात आले आहे.  लोकांच्या टॅक्समधून येणारा पैसा हा ग्रामीण भागात वापरायचा असतो. प्रत्येक मजुराला काम मिळाले पाहिजे. १० हजार कोटींची गंगाजळ ही टॅक्समधून ग्रामीण भागासाठी येते. ते पैसे वापरण्यात आले पाहिजेत. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांवर उपासमारीची वेळ येणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.