मुंबई : शहर आणि उपनगरात कोविड (Covid-19) रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. मुंबईत कोरोना (CoronaVirus) आटोक्यात आला होता. मात्र, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे. लोक कोरोनाबाबत गांभीर्य बाळगत नसल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली, मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा, तसेच राज्यातून बाहेर जाणारी रेल्वे सेवाही काही काळापुरती पुन्हा बंद करावी, का असा विचार राज्य सरकार करत असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या, शासनाने लवकर निर्णय घ्यावा. कोविडचा आकडा फुगत आहे. लोक करोनाबाबत गंभीर नाहीत. मुंबईचं राजकारण करण्याचा घाट दोन टक्यांच्या लोकांनी घातला आहे, असा आरोप महापौर पेडणेकर यांनी भाजपचे नाव न घेता केला आहे. केवळ घर्मस्थळं मी म्हटले नाही, बारसुद्धा, बारमध्ये जाणाऱ्यांमुळेही कोरोना पसरला. कोविडचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी, म्हणून इतर राज्यातील तुलनेत महाराष्ट्रात केसेस कमी आहेत. बक्कळ रग्गड, अशी भाजपची भूमिका चुकीची आहे, असे सांगत भाजपला टोला लगावला. आगामी निवडणुकीत आम्ही त्यांना दाखवून देऊ आमची ताकद काय आहे ते. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही दाखवून देऊ. भाजपचा हा पक्षाचा अजेंडा आहे. मुला मुलींचा पसंतीचा विषय आहे. भाजप फक्त शब्दांचा खेळ करत आहे, असे त्या म्हणाल्या.


दरम्यान, दिवाळीत लोकांचा एकमेकांशी वाढलेला संपर्क पाहता कोरोनाचा फैलाव वाढू शकतो. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. हेच विचारात घेऊन मुंबई महापालिकेनं कोरोना टेस्ट ड्राईव्ह सुरू केला आहे. दिवाळीत सर्वाधिक लोकांशी संपर्क झालेले दुकानदार, तिथले कर्मचारी आणि फेरीवाल्यांचा समावेश आहे. त्यामुळं या व्यक्तींच्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहे. याकरिता प्रत्येक दुकानात आरोग्य विभागाचे कर्मचारी जावून त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगत आहेत.