मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे गरिबांना अन्न मिळावे यासाठी पाच रुपयांत शिवभोजन थाळी सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. १ जुलै ते २० जुलैपर्यंत ८७० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १९ लाख ४८ हजार ४३० शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात गरीब आणि गरजूंना एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलैमध्ये आतापर्यंत १९ लाख ४८ हजार ४३० असे एकूण १ एप्रिल  ते २० जुलै या कालावधीत १ कोटी ९ लाख २७ हजार ९५९ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.



तसेच राज्यातील ५२ हजार ४३६ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे १ जुलै ते २० जुलैपर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ७३ हजार ३३१ शिधापत्रिका धारकांना २५लाख ७२ हजार १०९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.


राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३६ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १४ लाख ४ हजार ४८१ क्विंटल गहू, १० लाख ७७ हजार ६०६क्विंटल तांदूळ, तर १४ हजार ७१५ क्विंटल साखरेचे  वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे २ लाख ५१ हजार ८९७ शिधापत्रिका धारकांनी  ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो (गहू + तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे. १५ जुलै पासून आतापर्यंत जुलै महिन्यासाठी एकूण ४लाख १० हजार ९७८ रेशनकार्ड ला मोफत (गहू + तांदूळ) वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील १८ लाख ४४६ लोकसंख्येला ९० हजार २२ क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना ५किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.६ जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण १ कोटी ४० लाख १८ हजार ७६० रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ६ कोटी ३३ लाख ९२ हजार ६५ लोकसंख्येला ३१ लाख ६९ हजार६०३3 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.