आताच सावध व्हा ! मुंबईच्या या भागात वेगाने कोरोना पसतोय
Covid-19 Update in Mumbai : आता बातमी आहे वाढत चाललेल्या कोरोनासंदर्भातली. मुंबईच्या पश्चिम उपनगरांत कोरोना वेगानं पसरु लागला आहे.
मुंबई : Covid-19 Update in Mumbai : आता बातमी आहे वाढत चाललेल्या कोरोनासंदर्भातली. मुंबईच्या पश्चिम उपनगरांत कोरोना वेगानं पसरु लागला आहे. विशोषत:बोरिवली ते गोरेगाव या पट्ट्यात कोरना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. (Covid-19 patients increased from Borivali to Goregaon) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कामासाठी, फिरण्यासाठी शहराबाहेर जाणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिलेत. तसेच नागरिकांना मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेनं 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील मुलामुलींसाठी 1जून पासून 'हर घर दस्तक' ही मोहीम सुरु केली आहे. 31 जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.
राज्यात काल 1 हजार 357 नवीन रुग्णांचं निदान झालं. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर मुंबईमध्ये काल 889 रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 1 हजार 134 रुग्ण आढळले होते. तर मुंबईत 763 रुग्ण सापडलेले. त्यामध्ये शनिवारी वाढ झाली. एकंदरीत कोरोना वेगाने वाढत आहे.
राज्यातील कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी स्पष्ट केले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मास्क अनिवार्य केलेले नाहीत. मात्र, लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रात मास्क वापरणे आवश्यक आहे असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे, बस, चित्रपटगृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये आणि शाळा यासारख्या बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. लोकांनी अशा ठिकाणी मास्क घालणे अपेक्षित आहे, पीटीआयने वृत्त दिले आहे.