Coronavirus Cases : चीनमध्ये कोरोनाच्या (China Corona) नव्या व्हेरिएंटने (Coroa Variant) धुमाकूळ घातला आहे. एअरफिनिटी संस्थेच्या अहवालानुसार, चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. औषधांचाही तुटवडा जाणवू लागला असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. चीनच्या रुग्णालयांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण पाहायला मिळतायत. चीनबरोबर अमेरिकतेही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातही सतर्कतेचे आदेश
चीन आणि अमेरिकेत (America) वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतातही सतर्कतेचे (Alert Notice in India) आदेश देण्यात आले आहेत. देशातील प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Internation Air Port) परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी (thermal screening) केली जात आहे. अशात एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळवार तपासणीदरम्यान 9 प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. यातल्या दोन प्रवाशांना BQ.1.1 या सब व्हेरिएंटची लागण झाल्याचंसमोर आलंय.


नऊ रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री
नऊ बाधितांपैकी इतर सात प्रवाशांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले आहेत. BQ.1.1 आढले दोन रुग्णांपैकी एक 16 वर्षांचा असून तो लंडन इथून भारतात परतलाय. तर दुसरी 25 वर्षांची तरुणी असून ती स्वित्झर्लंडवरुन मुंबईत आली आहे. इतर सात प्रवासी हे मॉरिशस, लंडन, दोहा, इजिप्त, मस्कत, व्हिएतनाम आणि रियाज इथून भारतात परतले आहेत. यातील पाच रुग्ण हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सापडले. तर उर्वरित चार प्रवासी हे 24 ते 31 डिसेंबरच्या कालावधीत आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 


प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनुाकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. शक्य तो सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व राज्यांन देण्यात आल्या आहेत. सध्या तरी देशात परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. 


देशात XBB व्हेरिएंटचे 7 रुग्ण
दरम्यान, देशात XBB 1.5 व्हेरिएंटचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे या व्हेरिएंटच्या रुग्णांची एकूण संख्या सातवर पोहोचली आहे. छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये XBB 1.5 व्हेरिएंटच्या या दोन रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, गुजरातमध्ये तीन, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.