मुंबईसह राज्यातही कोरोना रुग्णांमध्ये घट, पाहा आज राज्यात किती रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येत किंचीत घट झाली आहे
मुंबई : मुंबईसह आज राज्यात कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णांत काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात ३३ हजार ४७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत जवळपास १० हजारांनी घट झाली आहे. रविवारी राज्यात 44 हजार 388 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले होते.
राज्यात आज ८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३ टक्के इतका आहे. तर गेल्या चोवीस तासात २९ हजार ६७१ जण बरं होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९४.९५ टक्के इतकं झालं आहे.
सध्या राज्यात १२, ४६, ७२९ जण होमक्वारंटाईन आहेत, तर २५०५ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज किती ओमायक्रॉन रुग्ण
राज्यात आज ३१ ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुणे मनपा २८, पुणे ग्रामीणमध्ये २ आणि पिंपरी-चिंचवड भागात एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १२४७ ओमायक्रॉन रुग्णसंख्या झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक ६०६ रुग्ण आहेत. तर त्याखालोखाल पुण्यात २५१ रुग्ण आहेत.