मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक लशींचे 80 हजार  डोस मुदतबाह्य होणार आहेत. मात्र, या मुदतबाह्य लशींचं काय करायचं हा मोठा पेच निर्माण झाला आहे. नफ्याच्या उद्देशाने लशींची साठेबाजी करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरणाला मिळत असेलेल्या कमी प्रतिसादा यामुळे 80 हजार लशींचा साठा मुदतबाह्य होणार आहे. तसंच, या मुदतबाह्य लशींचा दुष्परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे. 


दरम्यान, केंद्र सरकारने मुदतबाह्य लशींबाबत मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली नाही. त्यामुळे मुदतबाह्य लशींच्या विल्हेवाटीचा पेच निर्माण झाला आहे. 


कोरोना पुन्हा येतोय; 2 शहरांमध्ये लावले कठोर निर्बंध


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. चीनमधील मोठी शहरं Shenzhen आणि Shanghai शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतायत. यामुळे दोन शहरांमध्ये कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.


कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याने चीनी प्रशासनाला चीनमधील प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करावं लागलं आहे.