मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एकट्या मुंबईमध्येच कोरोनाग्रस्तांची संख्या सगळ्यात जास्त आहे. कोरोनाच्या या संकटात मुंबईमधील गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने केला जाणार आहे. कोरोनामुळे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेश मंडळांना सूचना केल्या आहेत, तसंच नियमावलीही ठरवून दिली आहे. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन समन्वय समितीने केलं आहे. समितीच्या या आवाहनाला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली आहे.


गणेश मंडळांसाठी नियमावली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्गणी 


मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम)  विभागीय वर्गणी घेऊ नये. पण केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करावे.


गणेश मूर्ती


कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा. शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे .


मंडप/रोषणाई


मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.


आगमन


गणपतीच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे.


दर्शन


मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस ( भटजी कार्यकते इत्यादी) हात-पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल, अशी व्यवस्था करणे.


कार्यक्रम


गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे.


विसर्जन


आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच गणपतीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.