नवी मुंबई : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वेकडून महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. उद्यापासून फक्त अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या प्रवशांनाच रेल्वेने प्रवास करता येणार आहे. यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामध्ये रेल्वे पोलीस, राज्य पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाचा अधिकारी असेल. कोकण विभागातील ५ जिल्ह्यांमधली १३५ रेल्वे स्टेशनवर विशेष पथक नेमण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ट्रेनच्या दैनंदिन फेऱ्याही ३० ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. अनावश्यक प्रवास करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच होम क्वारंटाईन असणारी व्यक्ती आढळल्यास त्याची रवानगी क्वारंटाईन कक्षात १४ दिवस करण्यात येणार आहे, असा इशारा शिवाजी दौंड यांनी दिला आहे. 


मुंबई लोकलमधल्या गर्दीसोबतच कोकण रेल्वेमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कोकण विभागीय आयुक्तांनी सांगितलं.