Coronavirus : मुंबईत प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर; 24 तासांत 94 इमारती सील
कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirused increased in Maharashtra) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 24 तासांत 6 हजार 112 नवे रुग्ण तर 44 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. राज्यात परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे कोरोनाचे नियम कठोर केले जात आहेत. मुंबईतही प्रतिबंधित इमारतींचे नियम (Mumbai Building sealed) कठोर केले आहेत.
गेल्या 24 तासांत 94 इमारती सील करण्यात आल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे सील केलेल्या इमारतींची संख्या 321वर गेली आहे. सील केलेल्या इमारतीमधील रहिवासी घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Coronavirus : 94 Buildings Sealed in 24 hours for increase in Mumbai corona patients)
राज्यात शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे राज्यात शुक्रवारी कोरोनाचे ६ हजार 112 नवे रुग्ण आढळले. गेल्या डिसेंबरनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाचदिवशी झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तर दिवसभरात ४४ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. राज्यभरात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 44 हजार 765 वर पोहोचली आहे. त्यामध्ये मुंबईतील 5162, पुण्यातील 5226 रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी दिवसभरात 2 हजार 159 रुग्ण बरे होऊन घरी गेले..
16 फेब्रुवारीपासून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज सुमारे एक हजारने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे पाच बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. इमारत सील केल्यानंतरही काही रहिवासी घराबाहेर जात असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील तब्बल ९४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आता ३२१ इमारती सील आहेत. इमारतींमधील रहिवाशांना पुढील १४ दिवस इमारतींबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.