मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजूनही काही जण राजकारण करत आहेत. पण त्यांना राजकारण करू द्या असा टोला विरोधकांना लगावला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष शेलार यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला दिला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून महाराष्ट्राला संबोधन केले त्याचे स्वागत आहे. हे खरं आहे की, राजकारणाची वेळ नाही. पण राजकारण करू नये. घाणेरडे राजकारण करू नये हा संदेश सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिला असता तर बरं झालं असतं असं त्यांनी म्हटलं आहे.'



वांद्रेची घटना घडल्यानंतर राज्यातील पर्यटन मंत्री आपल्या परिवारातील सदस्य टीका करतात तेव्हा हे उत्तर देणं अपेक्षित आहे. तसेच कोरोना विषयात संपूर्ण महाराष्ट्र विरोधी पक्षासह तुमच्या सोबत आहे. याबाबत आश्वस्त असंही भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियु्क्त आमदार म्हणून घोषित करावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली आहे. मात्र अद्याप याबाबत राज्यपालांनी कोणतीही घोषणा न केल्याने काही दिवसांपू्र्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून 'राजभवन कोणत्याही राजकारणाचा अड्डा बनू नये तसेच यावेळी रामपाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येत आहे' असं ट्विट केलं होतं.