मुंबई : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. या संदर्भात, केंद्राने 6 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशाला पत्र लिहून वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त केलीये. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, तामिळनाडूच्या प्रधान सचिवांना आणि आरोग्य सचिवांना स्वतंत्र पत्रं लिहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रात राजेश भूषण यांनी प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांबाबत वेगवेगळी माहिती दिलीये. याशिवाय जिथे गेल्या एका महिन्यात कोविडचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. या पत्रात असं म्हटलंय की, आगामी सणासुदीच्या काळात सर्व राज्यांनी अतिरिक्त दक्षता घ्यावी आणि कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावं.


केंद्राचा लसीकरणावर भर 


राज्यांनी संक्रमित व्यक्तींच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था करावी आणि संपूर्ण प्रक्रियेचं पालन करावं, असं या पत्रात म्हटलंय. याशिवाय कोविड लसीकरणावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. राज्यांनी सर्व संशयित व्यक्तींचे गोळा केलेले नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत. 


भूषण यांनी या पत्रात म्हटलंय की, कोविडचा सामना करण्यासाठी देशात कोणत्याही संसाधनाची कमतरता नाही, राज्यांनी त्याचा पुरेपूर वापर करावा.


कोणते सण साजरे केले जातील


ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. सावन महिन्यात कंवर यात्रा काढली जाते. या दरम्यान लोकसहभागही मोठ्या प्रमाणात होतो. सावन पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानंतर गणेश चतुर्थीचा उत्सव होईल. ऑगस्टमध्येच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. यानंतर शारदीय नवरात्री म्हणजेच दुर्गापूजा-दसरा, दीपावली आणि छठ हे सण सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साजरे केले जातील.