मुंबई : जगभरात कोरोना साथीचा  (Corona Pandemic) कहर थांबण्याचे नाव घेत नाही. ब्रिटनमधील (UK) कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे भीती कमी झालेली नाही. कोविडनंतरच्या काळात झालेल्या आणखी एक दुष्परिणामाने डॉक्टरांना चकित केले. दिल्लीत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये नवीन आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. कोरोना माहामारीचा पहिला साइड इफेक्ट समोर आला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये (Aurangabaad), एका महिलेला कबंरचे दुखण्यानंतर महिलेल्या संपूर्ण शरीरावर पू असल्याचे दिसून आले. जगभरात अशी सात प्रकरणे समोर आली आहेत. कोविडच्या काळानंतर भारतात ही पहिला प्रकार पुढे आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांना पीडितेच्या शरीरात कोरोनाची अॅन्टीबॉडीज  (Antibodies) सापडली होती. कोरोना व्हायरसच्या संसर्गाने बरे झाल्यानंतर हे नवीन लक्षण आहे. तथापि, ही महिला चांगली आहे. या महिलेवर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि आता ती पूर्णपणे निरोगी आहेत. औरंगाबादच्या हेडगेवार हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जिल्ह्यातील बजाज नगर येथील रहिवासी असलेल्या या महिलेला बराच काळ कंबर दुखीचा त्रास होत होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिची एमआरआय घेतली आणि अहवाल पाहून चकीत झाले आहे.


या महिलेची तब्बेत चांगली


महिलेच्या संपूर्ण शरीर 'पू'ने भरलेले दिसून आले. गळा आणि अगदी दोन्ही हात आणि पोट 'पू'ने भरलेले होते. डॉक्टरांनी तातडीने तिला दाखल करुन घेतले. शस्त्रक्रियाकरुन पू बाहेर काढण्यात आला. शस्त्रक्रीया केल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. त्याचवेळी, तीन वेळा  शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिलेच्या शरीराच्या अर्ध्या लिटरपेक्षा जास्त 'पू' बाहेर काढण्यात आला. २१ डिसेंबरला महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. निरोगी झाल्यानंतर, ती महिला आता डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


युरोपमध्ये धोकादायक घटना


अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना विषाणूचे सर्वात धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. युरोपच्या जर्मनीमध्ये असे सहा प्रकार आढळले आहेत. रुग्णालय अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा अधिक अभ्यास सुरू आहे. सप्टेंबरच्या जर्नल ऑफ न्यूरोलॉजीच्या 'कोरोनामध्ये बरे झाल्यानंतर अलौकिक लक्षणे' या विषयावर त्यांना अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती.