मुंबई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतानाच दिसून येत आहे. धोका कायम असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतही कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Mumbai) रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. सध्या बेडची संख्या कमी पडू लागली आहे. त्यातच कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम आजपासून पुढील तीन दिवस थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचे आणखी रुग्णवाढ लक्षात घेता मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation ) 200 व्हेंटिलेटर (200 Ventilators) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेने 200 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 100 व्हेंटिलेटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरु केली, आता ती पूर्ण झाली असून लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. हे व्हेंटिलेटर कोविड रुग्णालय आणि कोविड केंद्रांना दिले जाणार आहेत. 


कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर न दिल्याने दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण दिसून आला. वाढती कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय झाली आहे. यंदाच्या फेब्रुवारीपासून करोनारुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. यापैकी बहुसंख्य रुग्णांचे घरातच क्वारांटाईन करण्यात आले आहे. असे असले तरी सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांची प्रकृती अचानक खालवण्याची शक्यता असते, त्यामुळे भविष्यात अधिक व्हेंटिलेटर लागण्याची गरज ओळखून हे 200 व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेतला.


सध्या मुंबई सुमारे 10 टक्के रुग्णांना उपचाराची गरज असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना खासगी तसेच पालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. त्यानुसार अधिक व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येत आहे. तीन वर्षे हमी कालावधी आणि पुढील पाच वर्षांची देखभाल याकरिता 16.77 कोटी रुपये खर्च व्हेंटिलेटर खरेदीवर केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.