.... आदेशावरून! 31 डिसेंबरला पार्टी करण्याआधी हे नियम लक्षात ठेवा
Coronavirus : नव्या वर्षाची सुरुवात करताना कोरोनाला विसरु नका
मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात दणक्यात करण्यासाठी आतापर्यंत अनेकांनीच काही बेत आखले असतील. काहींनी कोरोनाच्या संकटाला अनुसरून हे बेत आखले असतील. तर काहीजण कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सरकार कोणती नियमावली देतं याच्या प्रतीक्षेत असतील.
याच सर्व वातावरणात आता प्रशासनाकडून नागरिकांसाठी 31 डिसेंबरसाठी काही नवे नियम देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचं संकट पाहता या नियमांची अंमलबजावणी करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. त्यामुळं तुम्हीही पार्टीचा बेत आखताय, तर हे नियम लक्षात ठेवा.
- बंदिस्त सभागृहात कार्यक्रमासाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीतांसाठीच परवानगी
- मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीची परवानगी
- समुद्रकिनारे, बाग आणि रस्त्यावर नागरिकांनी गर्दी करू नये
- ज्येष्ठ, 60 वर्षांवरील नागरीक आणि 10 वर्षांखालील लहान मुलांनी घराबाहेर पडू नये
- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी या आणि अशा इतरी ठिकाणी गर्दी करू नये
- नव वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करू नये, मिरवणूक काढू नये
- फटक्यांची आतिषबाजी करू नये