मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात रूग्णांची संख्या ११६ वर
काळजी घ्या, घरी राहा
मुंबई : मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चार नवे कोरोनाग्रस्त रूग्ण मुंबईत सापडले असून आता राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पोहचली ११६ वर पोहोचली आहे. मुंबईत एकूण कोरोना रूग्ण ४५ कोरोनाबाधित सापडले आहेत. मुंबईत रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
सांगतील एका कुटुंबातील ५ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११२ वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्र राज्यात असल्याची माहिती आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे एक दिलासादायक माहिती आहे. पुण्यातील सर्वात प्रथम आढळलेल्या कोरोनाच्या २ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्याती हे कोरोनाग्रस्त दाम्पत्य दुबईहून आलं होतं. त्यांची चाचणी करण्यात आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले होते. मात्र १५ दिवसांच्या उपचारानंतर हे दाम्पत्य आता पूर्णपणे बरे झाले आहेत. या दोन्ही रुग्णांची १५ दिवसांनंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. त्या चाचणीमध्ये दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.