कोरोनाचे सावट : मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द
मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आणि गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका जास्त असल्याने मध्य रेल्वेने खबरदारी घेतली असून लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य रेल्वेने मुंबईत लोकल रेल्वेची स्वच्छता हाती घेतली आहे. रेल्वे अधिक कशी जंतुनाशक राहिल यावर भर देण्यात आला आहे. आता तर मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या १७ ते३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. (रद्द केलेल्या गाड्या बातमीच्या शेवटी स्क्रोल करुन पाहा)
गर्दी टाळण्यासाठी तिकीट दरात वाढ
कोरोना व्हायरसच्या (COVID-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर १० रुपये इतका होता. मात्र, आता या तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागतील. पुढील आदेश येईपर्यंत तिकीटाचे हे दर लागू राहणार आहेत.
अनेकजण रेल्वे स्थानकांवर नातेवाईकांना सोडण्यासाठी जातात तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट काढतात. अनेकदा एका प्रवाशाला निरोप देण्यासाठी कुटुंबातील अनेकजण विनाकारण गर्दी करतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मध्य रेल्वेने १७ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत.
या गाड्या केल्या रद्द