आप वहाँ से याद करना हम यहाँ से मुस्कुरायेंगे; राऊतांचा भावूक अंदाज
संजय राऊतांकडून भावूक ट्विट
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा आजचा १६ दिवस. सतत घड्याळ्याच्या काट्यावर धावणारा प्रत्येकजण कोरोनाशी लढण्यासाठी घरात बसून आहेत. अशा अवस्थेत मन निराश आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटता येत नाही म्हणून मन उदास आहे. असं असताना शिवसेना नेता संजय राऊत यांनी ट्विट करून दिलासा दिला आहे.
ना तुम घर से निकलना ना हम कही दूर जाएंगे...... अपने अपने हिस्से की दोस्ती निभाएंगे..... बहुत अच्छा लगेगा जिंदगी का ये सफर .... आप वहाँ से याद करना हम यहाँ से मुस्कुरायेंगे
सुप्रभात... असं म्हणत संजय राऊतांनी ट्विट केलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सगळेजण आपापल्या घरी आहेत. एकमेकांना भेटणं खूप कठीण आहे. पण कोरोनाशी लढण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्शिंग पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. अशावेळेत एकमेकांना धीर देणं अत्यंत महत्वाचं आहे. संजय राऊतांनी आपल्या ट्विटमधून हेच केलं आहे.
लॉकडाऊन हा २१ दिवसांचा काळ प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. या दिवसांत आपण आपापल्या घरी राहून कोरोनाशी लढू शकतो. अशावेळी प्रत्येकजण आपापला हा वेळ खास बनवत आहे. प्रत्येकजण आपले छंद जोपासताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या मुलीने संजय राऊत पेटी वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. कायमच राजकारणात व्यस्त असणाऱ्या संजय राऊतांची ही एक वेगळी बाजू पाहायला मिळाली.