मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असताना सोमवारी शेअर बाजार अतिशय कमी अंकांनी बंद झाला असं असताना मंगळवारी शेअर बाजार अतिशय मजबूत सुरूवात झाली. मंगळवारी सकाळी सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (Nifty 50) दोन्ही इन्डेक्स वाढत असून आता हिरव्या रंगाचा ट्रेंड सुरू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सेक्स १०७४.९९ अंकांनी वाढ झाली असून २७,०५६.२३ अंकांनी उघडलं. तर निफ्टी २३८.०५ अंकांनी वाढली असून ७,८४८.३० अंकांनी उघडलं आहे. प्री ओपनिंग सेशनमध्ये शेअर बाजाराची सुरूवात झाली असून सकाळपासूनच सकारात्मक बदल शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स जवळपास १५०० प्वाइंट वाढ झाली आहे. तर निफ्टी ८००० अंक पार करून वाढ झाली आहे. 



सोमवारी बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३९३४.७२ अंकांनी खाली जाऊन २५,९८१.२४ अंक आणि निफ्टी १,१३५.२० पॉइंट घसरण होऊन ७,६१०.२५ अंकांवर बंद झालं. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं. आतापर्यंत ३० राज्यात ही स्थिती ओढावली आहे. काही राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. ​