मुंबई : कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचा शोध लागला आहे. मंगळवारी मुंबई महापालिकेने त्यांचा शोध घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सहा जणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल बुधवारपर्यंत येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसोबत पुण्यातील दाम्पत्यासह 40 जण दुबईला फिरायला गेले होते. परदेशातून प्रवास करून आल्यावर त्यांना आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. त्या दोघांना तात्काळ नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आलं. (पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह राहणाऱ्या बीडच्या तिघांवर आरोग्य विभागाची नजर)


यानंतर या दाम्पत्यासह प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. यानुसार मुंबईतील या सहा प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रूग्णालयात दाखल केलं आहे. कोरोनाची लागण ही 28 दिवसांपर्यंत कधीही होऊ शकते. त्यामुळे यांच्यावर आणखी 18 दिवस नजर ठेवण्यात येणार आहे. (पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर)



यांच्यासह बीडमधील तीन जण दुबईला गेले होते. त्यांच्यावर देखील आरोग्य विभागाची नजर असून त्यांच्या देखील चाचण्या करण्यात येणार आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्त जे देश घोषित करण्यात आले होते. त्यामुळे दुबईचा समावेश नव्हता. संशयित रूग्णानंतंर दुबईहून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे.  ('त्या' टॅक्सी ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण, मुंबईतही कोरोनाची एन्ट्री ?) 


दुबईला 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत फिरायला गेले होते. 1 मार्चला ते मुंबईहून पुण्यात गेले. या दाम्पत्यापैकी पुरूषाला सुरूवातीला ताप आला. त्यानंतर सहा दिवसांनी त्यांनी कोरोनाची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या चाचण्या केल्या. याच्या अहवालामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. पत्नीची देखील तपासणी केली. त्यांच्यामध्ये सौम्यप्रमाणात लक्षण दिसली. त्या दोघांना नायडू रूग्णालयात दाखल केलं आहे.