मुंबई: सोशल मीडियावर सातत्यानं वेगवेगळे ट्रेन्ड व्हायरल होत असतात. कधी व्हिडीओ चॅलेंज, कधी नथ तर कधी साडी तर कधी बहिणी-भाऊ. सध्या तीन चॅलेंज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यापैकी व्हॅलेंटाइनच्या निमित्तानं या चॅलेंजला अधिकच महत्त्व आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपल चॅलेंज हे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत किंवा साथीदारासोबतचा फोटो अगदी डोळे झाकून सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशा वेगवेगळ्या चॅलेंजपासून कधी आपल्याला धोका पोहोचेल हा विचारच केला जात नाही. मात्र अशा चॅलेंजना भुलणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 


एकूण व्हॅलेंटाइन डे असो किंवा नसो अशा चॅलेंजपासून कधीतरी गैरप्रकार घडण्याचे धोके असू शकतात असा विचार न करता सऱ्हास आपला फोटो अपलोड करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोलिसांनी कपल्सना विशेष आवाहन केलं आहे.


 



कपल चॅलेंजमध्ये सहभागी न होण्याचं आवाहन महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने फेसबुकवर केलं आहे. या चॅलेंजमध्ये जे फोटो अपलोड केले जातात त्याचा अगदीत सहपणे कुणीही गैरवापर करू शकतं. महिलांच्या फोटोचा गैरवापर करून पैसे उकळले किंवा बदनामीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोशल मीडियावर हॅकिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातूनच तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचा फायदा कोणीही घेऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे धोके वेळीच ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चॅलेंजला भुलू नये असा सावधनातेचा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपण सोशल मीडियावर होत असलेले फसवणुकीचे प्रकार पाहात आहोत. त्यामुळे या चॅलेंजच्या नादात आपण तर हॅकर्स किंवा फायदा उचलणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांचं सावज होणार नाही ना याची काळजी घेणं आणि सतर्क राहाणं गरजेचं आहे.