Rahul Shewale : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale)  यांच्यावर  एका महिलेचे शोषण केल्याचा आरोप झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची फूस असल्याचा दावा शेवाळे यांनी केला होता. तसेच ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळे यांनी केली होती. मात्र,  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम(Underworld don Dawood Ibrahim) याचे नाव घेऊन राहुल शेवाळेच फसले आहेत.  कोर्टाने शिंदे-फडवीस सरकारला राहुल शेवाळे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 
कोर्टाच्या आदेशामुळे खासदार राहुल शेवाळेच्या अडचणी वाढ होणार आहेत. कथित प्रेयसीचे संबंध दाऊदशी असल्याचा आरोप शेवाळेंनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपांनंतर शेवाळेंच्याच अडचणीत वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेचे दाऊदशी संबंध होते मग शेवाळेंनी का लपवले? कथित प्रेमप्रकरणात शेवाळेंच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश द्या अशी मागणी तक्रारदाराने सत्र न्यायलयाकडे केली होती. त्याची दखल घेत न्यायाधीशांनी तातडीने सरकारी वकिलांची नियुक्ती करून शेवाळेंची चौकशी करा असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून माझे राजकीय आणि वैयक्तीक आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला होता.


दरम्यान, शेवाळे यांच्यावर झालेल्या आरोपावरुन राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले होते.  राहुल शेवाळे प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई इशारा  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी दिला होता.  


नेमकं काय आहे प्रकरण


शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. व्हायरल झालेल्या व्हिडिओत खासदार राहुल शेवाळे एका महिलेसोबत दिसत आहे, यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. यानंतर राहुल शेवाळी यांनी पत्रराप परिषद घेत आपली भूमिका मांडली. फेक अकाऊंटच्या माध्यमातून महिलेने मला ब्लॅकमेल केल्याचा दावा करत राहुल शेवाळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आरोप करणारी महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानशी संबध आहेत. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. या महिलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे असंही राहुल शेवाळे म्हणाले.