मुंबई : मुंबईतील लसीची (Mumbai Vaccination) कमतरता लक्षात घेता रविवारी 1 लाख 58 हजार डोस लसीचा साठा मिळाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे (BMC) शासकीय (Government Centre) आणि खासगी लसीकरण केंद्रांवर (Private Vaccination Centre) ही लस पोचविण्यात येतेय. त्यामुळे आजपासून पुढचे तीन दिवस मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर (Mumbai Vaccination Centre) लस उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यादरम्यान, मुंबईला मिळालेल्या लसीमध्ये कोवाक्सिनचा साठा खूपच कमी आहे. म्हणूनच, ज्या काही केंद्रांमध्ये कोवॅक्सि दिले जातंय तिथे दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जातंय. कोविशिल्टचा साठा जास्त असल्याने लस देण्यास काहीच अडचण येणार नाही.


मुंबई महानगरपालिका आणि सरकारच्या वतीने खासगी रुग्णालयात तब्बल 59 लसीकरण केंद्रे आणि 73 लसीकरण केंद्र सुरू आहेत. एकूण 132 लसीकरण केंद्र सध्या कार्यरत आहेत. पण कधी लसीचा पुरवठा कमी झाल्यामुळे हा साठा कमी होतोय. ज्यामुळे काही लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण थांबवावे लागलंय. यामुळे, दुसरा डोस घेतलेल्यांना प्राधान्य देण्याचे आणि साठा पाहून लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याचे काम सुरू केले आहे.



मुंबईत लसीकरणाच्या तुटवड्या आभावी काल केवळ 37 लसीकरण केंद्र सुरू होते. काल मुंबईला 1 लाख 50 हजार कोव्हीशिल्ड लसींचे डोस तर आठ हजार कॉवक्सिनचे डोस उपलब्ध झाल्याने पुन्हा एकदा मुंबईत लसीकरण सुरळीत सुरू झाले आहे मुंबईतील नेस्को लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र येथे दिसत आहे. जरी गर्दी असली तरी लोक लसीकरणाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देताना दिसत आहेत


ही लस पुढील तीन दिवस पुरेल. सहसा, ही लस उपलब्ध झाल्यानंतर उशीरा संध्याकाळी वितरित करण्यास सुरवात होते. रविवारी रात्रीपर्यंत ज्या केंद्रांवर लसीचा साठा पोहोचू शकला नाही त्यांना सकाळी 8 वाजेपासून लस पोचणे सुरू झाले. म्हणून आज काही केंद्रांमध्ये लसीकरण सुरू होण्यास थोडा वेळ लागला. पालिका प्रशासन आणि आरोग्य सेवांशी संबंधितांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन बीएमसीने केलंय.