मुंबई : कोरोनाच्या एक्सई व्हेरिएंटचा (XE Variant) आणखी एक रुग्ण मुंबईत सापडला आहे. संबंधित 67 वर्षीय रुग्ण हा गुजरातमधील वडोदरा येथे गेला होता. 11 मार्च रोजी ही व्यक्ती इंग्लंडहून आलेल्या दोन नागरिकांच्या संपर्कात आला होता. यानंतर त्याला ताप आल्यानंतर टेस्ट केली असता तो पॉझिटीव्ह आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 मार्चला खाजगी वाहनाने मुंबईतील सांताक्रूज पश्चिम येथील घरी परतला आणि 7 दिवस घरीच क्वारंटाईन झाला. त्याची पत्नी आणि मोलकरीण यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आलेली होती. सध्या या रूग्णाची तब्येत ठिक असून कोणतीही लक्षणे नाहीत.


XE Variant चा एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. मुंबईतील सांताक्रूझहून गुजरातला गेलेल्या एकाचा नमुना जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवला. त्या रुग्णामध्ये एक्स ई व्हेरियंट आढळल्याचं टोपेंनी सांगितलं. मात्र हा व्हेरियंट फारसा घातक नसल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.


याआधी मुंबईत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णाला एक्सई व्हेरिएंटची लागण झाली होती का यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद पाहायला मिळाले. चाचणीमध्ये चूक झाल्याचं केंद्राने म्हटलं होतं. दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.