मुंबई : Covid-19 New Strain : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (new variant Omicron) पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) राज्य सरकारने नवे नियम जारी केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळे चैत्यभूमीवर जायला बंदी घातली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण दिन अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


मुंबईतील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्राम स्थळ होते. तेथेच त्यांची समाधीदेखील आहे. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. देशभरात हा महापरिनिर्माण दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा हा 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोकांनी एकत्रित न येण्याच्या सूचना केल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवरील कार्यक्रमांचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता घरी थांबूनच आंबेडकरांना अभिवादन करावे, असे सांगण्यात आले आहे.


 महापरिनिर्वाण दिनी नवे नियम जारी  


राज्य शासनाने जारी काही सूचना जारी केेल्या आहेत. चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पॉर्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.