Covid-19 | मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली? संसर्गात अचानक घट होण्यामागची कारणं
Third wave in mumbai : मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड-19 बाधित नवीन रुग्णांमध्येघट नोंदवली गेली. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट सोमवारी 28 टक्के होता. जो मंगळवारी 18.7 टक्क्यांवर घसरला. यावर तज्ज्ञांचे म्हणणे होते की, ही साथ झपाट्याने कमी होण्याचे लक्षण आहे.
मुंबई. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड-19 बाधित नवीन रुग्णांमध्येघट नोंदवली गेली. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट सोमवारी 28 टक्के होता. जो मंगळवारी 18.7 टक्क्यांवर घसरला. यावर तज्ज्ञांचे म्हणणे होते की, ही साथ झपाट्याने कमी होण्याचे लक्षण आहे.
महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईने तिसऱ्या लाटेचा पिक पार केला आहे. एका अहवालानुसार कोविड-19 ची तिसरी लाट लवकरच ओसरू शकते. पुढे ते म्हणाले की काही दिवसापूर्वी दिसणारा पॉझिटिव्हिटी रेट आता कमी झाला आहे.
डॉ जोशी म्हणाले की, गेल्या तीन ते चार दिवसांत आम्ही एक ट्रेंड पाहिला आहे की, ज्यामुळे मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
बरेच लोक आता घरी आहेत, अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. ज्यांना सौम्य लक्षणं आहेत ते सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहेत आणि त्यांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. दुसरे, बरेच लोक स्वत: चाचणी करत आहेत. तिसरे, आम्हाला अचूक संख्या माहित नाही. असे असू शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे खरे परिणाम रुग्णालयात किती लोक दाखल होतात या संख्येवरून कळू शकेल.
महाराष्ट्र आणि मुंबईत सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत घट झाली आहे. मुंबईत सलग 4 दिवसांपासून तुलनेने कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत
सोमवारी मुंबईत नवीन बाधितांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घट नोंदवली गेली असून 13 हजार 468 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर मंगळवारी 11647 रुग्ण आढळून आले. रविवारी हा आकडा 19 हजार 474 एवढा होता. याशिवाय शहरातील पॉझिटिव्हिटी दरही 20 टक्क्यांवर आला आहे.