नवी दिल्ली : कोरोना व्हायरस साथीची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक आहे. याचे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. व्हायरस आरटीपीसीआर (RT-PCR) आणि एंटीजन किटला देखील धोका देतोय. म्हणजेच कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्या व्यक्तीचा चाचणी अहवाल निगेटीव्ह येत आहे. यामुळे संसर्ग नियंत्रित करणे अधिक कठीण झाले आहे. अशा रूग्णांची दररोद नोंद घेतली जाते. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे अहवालही निगेटीव्ह येत आहेत. काही प्रकरणांमध्ये, दोन किंवा तीन चाचण्या नंतरही योग्य निकाल येत नाहीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला असे बरेच रुग्ण आढळले आहेत ज्यांना ताप, खोकला, श्वास लागणे आणि त्यांच्या सीटी स्कॅनमध्ये समस्या होती. हलके रंगाचे किंवा राखाडी ठिपके होते. जी कोरोनामध्ये संक्रमित होण्याचे थेट लक्षण आहेत, परंतु असे असूनही त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला असे आकाश हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आशिष चौधरी यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलेय. 



काही रूग्णांमध्ये ब्रोन्कोवलवेलर लव्हज झाले आहेत. ही एक निदान पद्धत आहे, ज्यामध्ये तोंड किंवा नाकात ट्यूबद्वारे चाचणी केली जाते. या तपासणीत कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण पॉझि़टीव्ह आढळले. ज्यांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह होता. यातून हे समजते की, नवीन कोरोना व्हायरस पारंपारिक चाचणी साधनांना धोका देतोय असे डॉ. चौधरी म्हणाले. 


त्या रुग्णांच्या घश्यात किंवा नाकात कोरोनाचा विषाणू नव्हता, म्हणूनच त्यांचे नमुने घेण्यात आल्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला नाही हे शक्य असल्याचे डॉ. प्रतिभा काळे म्हणाल्या. व्हायरस एसीई रिसेप्टर्स या फुफ्फुसांच्या पेशींमध्ये सापडलेल्या एक प्रकारचे प्रथिनेशी संबंधित आहे, म्हणून जेव्हा ब्रॉन्कोव्हॅलॉवर लॅव्हजमधील फुफ्फुसातून द्रवपदार्थाचे नमुने घेण्यात आले तेव्हा त्यात कोविड आढळल्याचे त्या म्हणाल्या.