Religion Converted : ऑनलाईन गेमच्या (Online Game) माध्यमातून अल्पवयीन मुलाला मुस्लीम धर्म (Muslim Religion) स्वीकारण्यासाठी भाग पाडल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये (Ghaizabad) गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातला आरोपी शाहनवाज फरार आहे, तो धर्मांतरासाठी (Religion Converted) सिंडिकेट चालवत असल्याचं उघड झालंय. विशेषत: 2 ऑनलाईन गेमिंग ऍप्सच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना इस्लामकडे झुकवण्यात येत होतं.  मुलं जाळ्यात फसली की त्यांच्यावर जवळच्य मशिदीत जाण्यासाठी दबाव आणला जात होता. धर्मांतराच्या या गाझियाबाद फाईल्सचे थरारक डिटेल्स समोर आलेत अवघ्या 2 मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या (Appllication) माध्यमातून अल्पवयीन मुलांना जाळ्यात कसं ओढलं जायचं पाहुयात.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मांतराचा ऑनलाईन 'गेम' 
Fortnite Gameच्या माध्यमातून मुस्लिमेतर अल्पवयीन मुलांना लक्ष्य केलं जातं. मुस्लीम युवकांनी हिंदू मुलांच्या नावानं फेक आयडी तयार केलं जायचं. खोटे आयडी असलेली धर्मांधांची एक टीम मुद्दाम गेम हरायची. पुढे गेम जिंकण्यासाठी कुराणच्या आयत लिहायला सांगितलं जायचं. 'डिस्कॉर्ड चॅट'च्या माध्यमातून सारी चॅटींग आणि कॉलिंग होत असे. झाकीर नाईक आणि तारिक जमील या इस्लामी कट्टरतावाद्यांचे व्हिडीओ दाखवले जायचे. जवळच्या मशिदीत नमाज पठण करण्यासाठी दबाव टाकला जात असे


विशेष म्हणजे या गेमिंग जिहादचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहचले आहेत. वसईतील जानी कुटुंबातील सदस्य राजेश जानी हेदेखील धर्मांतराच्या जाळ्यात अडकले. राजेश जानींना महमूद रियाज बनवल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही धर्मांतरासाठी त्रास दिला जातोय.. धक्कादायक म्हमजे या ऑनलाईन धर्मांतराचं मुंब्रा कनेक्शन उघड झालंय. खान शाहनवाज नावाचा व्यक्ती धर्मांतराचं हे सिंडिकेट चालवत असे. 400 अल्पवयीन मुलांचं त्यानं धर्मांतर केल्याचा उल्लेख एक कॉल रेकॉर्डिंगमध्ये पोलिसांना मिळालाय.


गाझियाबादचं प्रकरण काय होतं?
गाझियाबादमधल्या कविनगर भागातील एका अल्पवयीन मुलाचं धर्मपरिवर्तन केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आपला तेरा वर्षांचा मुलगा ऑनलाईन गेम खेळता-खेळता विचित्र प्रकार करत असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. हा मुलगा दिवसातल्या पाच वेळा जीमला जात असल्याचं सांगून घराबाहेर जायचा. त्यामुळे त्यांच्या वडिलांना संशय आला आणि त्यांचा पाठलाग सुरु केला. पुढे जे दृष्य दिसलं ते पाहून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. 


घरातून जीमसाठी बाहेर पडणारा हा मुलगा जवळच्याच एका मशिदीत नमाज पढण्यासाठी जात होता. वडिलांनी मुलाला विश्वासात घेऊन याबाबत विचारला असता मुलाने आपण इस्लाम धर्म स्विकारला असल्याचं सांगितंल. इतकंच नाही तर इस्लाम धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे, हे देखील त्याने आपल्या वडिलांना सांगितलं. मुलाचं बोलणं ऐकून वडिलांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्याच्या मोबाईलमध्ये इस्लाम धर्मासंबंधीत अनेक साहित्य आढळून आलं. आता गेमिंग जिहादचा हा प्रकार म्हणजे देशातल्या धर्मांतराच्या मोठ्या कटाचा भाग तर नाही ना याची कसून चौकशी सुरू आहे.