मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क गांधीजींनी चांगलेच फटकारले आहे. तू जिथून आलास, त्यांनाच विसरलास. तू प्रचारक होतास ना?


मोदींना चिमटा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरे बेटा नरेंद्र, असा उल्लेख करत महात्मा गांधी यांनी तुला जरा दोन गोष्टी सांगायच्या आहेत, असे म्हणत चांगलेच फटकारले. आम्ही बोलतोय ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राबद्दल.


प्रचारक होतास ना तू?


गांधींच्या दोन गोष्टी :  जवाहरलाल यांना पंतप्रधान मी केले! काँग्रेसने नाही! यावर काही बोलायचंय? आणि दुसरं म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री  होते तरी ते 'काँग्रसचेच' नेते होते ना? मग तुला त्यांचा पुतळा उभारावासा वाटला! पण तू जिथून आलास त्या हेडगेवारांचा किंवा गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला? प्रचारक होतास नातू? असे म्हणत गांधीनी  हातात 'भारताचा इतिहास' हे पुस्तक घेत मोदी यांना फटकारले, असे या व्यंगचित्रातून परखड ठाकरी फटकारे हाणलेत.


मोदींवर पुन्हा निशाणा


दरम्यान, काँग्रेसने सरदार पटेल यांना डावलून जावहरलाल नेहरु यांना पंतप्रधान केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर ह्ल्लाबोल केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय.