मुंबई : एरवी शेअर रिक्षासाठी, बससाठी रांगा लावणारे मुंबईकर आज मात्र वेगळ्याच ठिकाणी रांग लावताना दिसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोगेश्वरी भागात मटणाच्या दुकानाबाहेर भल्या पहाटे नागरिकांनी अशी रांग लावली होती. आज रंगांच्या उत्सवासोबतच घरी नॉन व्हेजचा बेत आखलेला असतोच. 


त्यामुळं सकाळी साडे सहा वाजल्यापासून अनेक लोक मटण घेण्यासाठी रांगेत दोन - दोन तास उभे राहिले.


रंगानी नाहून निघाल्यावर मटणावर आडवा हात मारायचा तर त्यासा्ठी आधीच मटण घरी आणलं पाहिजे. म्हणूनच भल्या पहाटे मुंबईकर असे रांगा लावतायत.