मुंबई : दक्षिण मुंबईत उद्योजक मुकेश अंबानी यांचं घर आहे. अंबानी यांच्या घरासमोर जवानाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने या जवानाचा मृत्यू झाला आहे. मुकेश यांच्या अंटालिया या दक्षिण मुंबईतल्या पेडर रोडवरील घरासमोर तो सुरक्षेसाठी तैनात होता. ही घटना 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सीआरपीएफचा जवान अंटालियामधील मधल्या गेटवर तैनात होता. या गेटचा वापर घरातील कर्मचाऱ्यांसाठी केला जातो. हा जवान सुरक्षेसाठी गेटवर उभा होता, त्यावेळी त्याच्या एका हातात मोबाईल होता. या जवानाने रायफलचा पट्टा हटवला. यावेळी चुकून ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळ्या सुटल्य़ा.


चुकून बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या या जवानाला लागल्या, उपचारासाठी त्याला जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला. काल जेजे रूग्णालयात पोस्ट मॉर्टम केल्यानंतर जवानाच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात आला. हा जवान गुजरातमधील जुनागडचा रहिवासी होता.


गावदेवी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुकेश अंबानी यांना सध्या झेड प्लस सुरक्षा आहे.