सीएसएमटी आणि कुर्ला मधील पूल बंद, गर्दीवेळी प्रवाशांची कोंडी
सीएसएमटी आणि कुर्ला मधील पूल रेल्वेने आता बंद केले आहेत.
मुंबई : सीएसएमटी हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर पालिका आणि मध्य रेल्वेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी सहायक अभियंता एस.एफ. काकुळतेला अटक करण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेने 30 एप्रिल पर्यंत पाच पादचारी पाडण्याचा निर्णर् घेतला. यामध्ये सीएसएमटी आणि कुर्ला स्थानकातील पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. यात सीएसएमटी आणि कुर्ला मधील पूल रेल्वेने आता बंद केले आहेत.
सीएसएमटी बंद पुलामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची कोंडी होत आहे. सीएसएमटी स्थानकातील कल्याण दिशेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उतरणारा पादचारी पूलाच्या जिन्यांच्या दुरुस्तीचे काम 26 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मेन लाइनवरुन येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. हा पादचारी पूल स्थानकातील एक ते सात प्लॅटफॉर्म जोडतो. हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आल्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी पाच धोकादायक पादचारी पूल बंद केले जाणार आहेत. त्यात भांडुप, विक्रोळी, दिवा, कल्याण, कुर्ला स्थानकातील पुलाचाही समावेश होता.
मनुष्यवधाचा गुन्हा
सीएसएमटी स्थानकाजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ बळी तर ३१ जण जखमी झाले होते. यानंतर विरोधकांनी यावर कडाडून टीका केली होती. स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई अटक केल्याची माहीती समोर येत आहे. नीरजवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यावर पालिकेने याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर टाकली होती. पण हा पूल आपल्याच अख्त्यारित असल्याची उपरती नंतर पालिकेला सुचली. यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी होऊ लागली होती.