मुंबई : सायबर क्राईम सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे काहीही करताना आपल्याला सावधगिरी बाळगने गरजेचे आहे. नुकतेच मुंबईत मालाड भागातील एका 29 वर्षीय महिलेला ऑनलाइन दारू खरेदीच्या प्रकरणात 1.6 लाखांचा गंडा घालण्यात आला. सायबर गुन्हेगारी करणाऱ्यांनी स्वत: ला मद्य दुकानातील कर्मचारी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासगी कोचिंगमध्ये शिकवणाऱ्या या महिलेने एक मीडियाला माहिती देताना सांगितले की, तिने 14 जुलैला संध्याकाळी सात वाजता स्थानिक दुकानातून दारू मागवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, स्टोअरमधील एका कथित कर्मचाऱ्याने तिची 1.6 लाख रुपयांची लूट केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या महिलेला दोनदा पैशांसाठी फसवले गेले आहे.


पोलिसांना दिलेल्या निवेदनात या महिलेने सांगितले की, "माझ्या पतीने मला चिंचोली वाईन शॉपमधून दारू मागण्यास सांगितले. मी त्याचा नंबर गुगलवर शोधला आणि कॉल केला. दारूच्या दुकानावर कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका फसव्या व्यक्तीने मला दारुसाठी 1,700 रुपये देण्यास सांगितले. मी पैसे दिले, पण त्याने जीएसटी पेमेंटसाठी आवश्यक असल्याचे सांगून मला व्हॉट्सअ‍ॅपवर क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. मी कोड स्कॅन केला आणि माझ्या खात्यातून 19 हजार 860 रुपये वजा केले गेले."


एकावृतानुसार जेव्हा महिलेने तिच्या या फसवणूकीबद्दल सांगितले, तेव्हा ती म्हणाली की, पहिले तिला वाटले की, हे चुकून झाले आहे,  यानंतर समोरच्या व्यक्तीने दुसरा क्यूआर कोड पाठवला. जेव्हा महिलेने त्याला स्कॅन केले तेव्हा तिच्या खात्यात दहा रुपये जमा झाले. यानंतर फसव्याने आणखी एक क्यूआर कोड पाठवला. यावेळी महिलेनं स्कॅन केला, तेव्हा त्याच्या खात्यातून 81 हजार 200 रुपये वजा केले.


क्यूआर कोडद्वारे फसवणूक


पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिलेने पुन्हा त्या नंबरवर कॉल केला, तेव्हा फसवणूक करणार्‍याने तिच्या खात्यात तांत्रिक समस्या असल्याचे सांगून माफी मागितली आणि पैसे परत करण्यासाठी दुसरा फोन नंबर आणि बँक खाते मागितले. तिने तिच्या पतीचा नंबर दिला आणि त्यावर तिला दुसरा क्यूआर कोड मिळाला. जेव्हा तिने तो स्कॅन केला तेव्हा खात्यातून आणखी 79 हजार 460 रुपये काढले गेले.


त्यानंतर महिलेनं पुन्हा त्या नंबरवर कॉल केला, तेव्हा फसवणूक करणार्‍याने सांगितले की, ते दारूची डीलिव्हरी करण्यासाठी तिच्या घरी येत आणि आणि घरी आल्यावर तो हे प्रकरण सोडवेल. मात्र, काही काळानंतर कोणीही न आल्याने पती-पत्नी दारूच्या दुकानात गेले. तेथे त्यांना समजले की, तो सायबर फसवणूकीच्या प्रकरणात अडकला आहे.


त्यानंतर या जोडप्याने नंतर पोलिस स्टेशनकडे धाव घेतली.