मुंबई : कोरोना व्हायरसचा एकंदर वाढता  प्रादुर्भाव पाहता, सध्याच्या घडीला संपूर्ण देश या वैश्विक महामारीचा सामना करत आहे. याच परिस्थितीत आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये सावट आहे ते म्हणजे एका वादळाचं. मुंबईसह नजीकच्या अलिबाग आणि कोकण किनारपट्टीवर Cyclone Nisarg निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. त्याच पार्श्भूमीवर रत्नागिरीपासून, अलिबाग, मुंबई आणि गुजरातच्या किनारी भागात या वादळाचे पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही हवामानात काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. तर, रत्नागिरीमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणात वादळी वारे घोंगावत असल्याचं चित्र धडकी भरवून गेलं.


CycloneNisarg : 'निसर्ग' धडकल्यास संकटसमयी काय करावं आणि काय करु नये?


 एएनआय या वृत्तसंस्थेनं विविध ठिकाणी या चक्रीवादळामुळं नेमकी काय परिस्थिती उदभवली आहे, याचे व्हिडिओ पोस्ट केले. ज्या माध्यमातून वादळाची नेमकी तीव्रता अनेकांच्या लक्षात आली. वाऱ्याचाएकंदर वेग पाहता रत्नागिरीमध्ये मोठमोठे आणि उंच वृक्षही हेलकावे खात असल्याचं दिसून आलं. तर, अलिबागमध्ये समुद्र चांगलाच खवळलेल्याचं दिसून आलं. 








निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला. समुद्राला आलेलं उधाण, वादळी वारे आणि विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेली एनडीआरएफची पथकं पाहता 'निसर्ग'चं रौद्र रुप धडकी भरवणारं आहे, असं म्हणायला हरकत नाही.