Taukta चक्रीवादळात भरकटलेल्या मालवाहू नौकेवरील सर्व 137 लोकांना वाचवण्यात यश
नौदलाच्या युद्धनौकांकडून युद्धपातळीवर अरबी समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु आहे. यापैकी Gal Constructor या मालवाहू नौकेवरील ( Barge ) सर्वच्या सर्व 137 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
मुंबई : नौदलाच्या युद्धनौकांकडून युद्धपातळीवर अरबी समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु आहे. यापैकी Gal Constructor या मालवाहू नौकेवरील ( Barge ) सर्वच्या सर्व 137 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. या सर्व लोकांच्या नौकेला टो करत माहीम किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. तर P 305 या मालवाहू नौकेवरील ( Barge ) 273 लोकांच्या सुटकेसाठी नौदलाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आयएनएस कोलकता, आयएनएस कोची या युद्धनौकांनी आज सकाळपर्यंत 111 लोकांना वाचवले आहे.
चक्रीवादळादरम्यान अरबी समुद्रात बॉम्बे हाय येथे अडकलेल्या बोटींना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाची मदत मागितली. त्यानंतर भारती नौदलाने आपली युद्धनौका आणि हवाई जहाज बचाव मोहिमेसाठी रवाना झाल्या. बॉम्बे हाय परिसरातील हीरा ऑईल फील्ड्समध्ये 273 जण जहाजात अडकलेल्या बार्ज 'पी 305' साठी नौदलाला मदतीसाठी ही विनंती करण्यात आली होती. या विनंतीनंतर भारतीय नौदलाने आयएनएस कोचीच्या माध्यमातून शोध आणि बचाव सुरु केला आहे. याशिवाय आयएनएसची दुसरी नौकाही तयारीला लागली आहे.
चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर बचाव मोहिमेसाठी इतर अनेक जहाजे आणि विमानांची तयारी करण्यात आली असल्याचे भारतीय नौदलाने सांगितले. दरम्यान, बार्जेतील खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. चक्रीवादळामुळे दोन बोटींसह 410 लोक खवळेल्या समुद्रात अडकले होते. नौदलाने समुद्रात अडकलेल्या 410 लोकांसह 2 बोटींना वाचवण्यासाठी युद्धनौकेची मागणी केली होती. या युद्धनौकेच्या मदतीने हे ऑपरेशन सक्सेस करण्यात आले.
एसएआर ऑपरेशन्स संपूर्ण रात्रभर सुरू होती.18 मे रोजी बार्ज 'P305'मधील एकूण १66 जणांना आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता यांनी अत्यंत आव्हानात्मक समुद्राच्या परिस्थितीतून बाहेर काढले. 137 जणांसह जहाजातील 'गॅल कन्स्ट्रक्टर' (GAL Constructor) हे कुलाब पॉइंटच्या उत्तरेकडील 48 एनएम उत्तरेकडे चालले होते. या जहाजावरील कर्मचार्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. आज सुरु असलेल्या बचाव प्रयत्नांना आज सकाळी भारतीय नौदला यश आले. यावेळी विमानाने नजर ठेवण्यात आली होती. हवामानाच्या परिस्थितीनुसार एसएआरसाठी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर तैनात केले होते.